मुंबई :- बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झालेले राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे पुन्हा मूळ पक्षात बुधवारी सक्रिय झाले आहेत.
यशवंतराव चव्हाण सेंटरमधील पक्षाच्या बैठकीत अजितदादांनी केवळ हजेरीच लावली नाही तर नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शनही केले. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडासंदर्भात शंका व्यक्त केली गेली नसेल तर नवलच

राष्ट्रवादीतील आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा अजित पवार यांना विश्वास होता. भाजपच्या नेत्यांनाही तसा त्यांनी शब्द दिला होता. पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे त्यांची जादू काही चालली नाही.
शपथविधीनंतर राष्ट्रवादीच्या जिल्हाप्रमुखांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली, पाठाेपाठ आमदारांचीही बैठक झाली.
या वेळी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड ही ज्येष्ठ मंडळी हजर होती. ज्येष्ठ नेते व्यासपीठावर होते व त्यांच्या मध्यभागी आसनावर अजित पवार होते.
‘झालं ते झालं, आता नव्याने सुरुवात करायची आहे. मी राष्ट्रवादी सोडलेली नव्हती, आजही मी पक्षात आहे. मी नाराज नव्हतो. मी कुठलेही बंड केले नव्हते. पक्षानेही माझी हकालपट्टी केली नव्हती,’ असे अजित पवार यांनी बाेलताना सांगितले.
दरम्यान राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने अजितदादांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली नाही. त्यामुळे त्यांचे बंड हे ‘नियाेजित’ हाेते काय, अशी शंका घेतली जात आहे.
Latest News Updates
देवेंद्र फडणवीसांनी रचले ‘हे’ तीन विक्रम
ती जेव्हा – जेव्हा शेतात जायची तेव्हा-तेव्हा तिच्यावर बलात्कार व्हायचा…!
भगतसिंह कोशारींची होणार हकालपट्टी, कलराज मिश्र होणार नवे राज्यपाल?
प्रेमासाठी वाट्टेल ते…पाकिस्तान सोडून आली भारतात, लग्नही केलं, नंतर….
पगार वाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर