वर्षही झाले नाही तोच श्रीगोंद्याचे तहसीलदारांची उचलबांगडी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या मदत अनुदान वाटपात झालेल्या हलगर्जीपणाचा ठपका ठेवून त्यांची बदली केल्याचे बदली आदेशात म्हटले आहे.

मात्र पडद्याआडचा खेळ काहीतरी वेगळाच असल्याचा तर्कवितर्क लावला जातो आहे. दरम्यान पवार यांनी पदभार घेऊन वर्षही झाले नाही तोच हि बदली तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

पवार यांचा बदली आदेश… पहा नेमके काय म्हणाले आहे आदेशात

पुरामुळे बाधित झालेल्या पात्र शेतकर्‍यांना मदत अनुज्ञेय असताना सदर मदतीचे वाटत न करताच दोन कोटी बारा लाख इतक्या रकमेची अनुदान समर्पित केलेले आहे.

तसेच अजूनच येथील पुरामुळे बाधित झालेल्या 383 खातेदारांपैकी 206 बाधित खातेदारांना होणारी मदत विविध कारणामुळे देण्यात आलेली नाही.

त्याचप्रमाणे चार गावातील 36 शेतकऱ्यांना पात्र मर्यादा पेक्षा अतिरिक्त क्षेत्रासाठी मदतीचे वाटप पवार यांनी केलेले आहे. त्यानुसार पवार यांची यांनी शासकीय कर्तव्य व जबाबदारी तत्परतेने पार पडलेली नाही. यास्तव त्यांची बदली करण्यात येत आहे. त्यांना आता पुनर्वसन अधिकारी केवडिया कॉलनी जिल्हा नंदूरबार या रिक्त पदावर पाठविण्यात आले आहे.

नागरिकांची अपेक्षाभंग… :- पवार हे शिरूर तालुक्यातील असून, श्रीगोंद्याची त्यांना इत्थंभूत माहिती असल्याने त्यांचा कार्यकाल चांगला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात लोकांना विश्वासात न घेता केलेले काम यांच्या अडचणीत आल्याचे लक्षात येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe