पैशाचे अमिश दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बहिणीच्या सतर्कतेने आरोपीला अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कर्जत तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहन जोशी निंबाळकर, रा. पाटेवाडी असे आरोपीचे नाव आहे.

मागील काही दिवसांच्या दरम्यान कर्जत लतालुक्यातील मौजे पाटेवाडी गावात आरोपी मोहन जोशी निंबाळकर, रा. पाटेवाडी याने अल्पवयीन मुलगी ही शेळ्या चारण्यासाठी गेली असता पाचशे रुपये देऊन तिला त्याचे घरात घेऊन जाऊन ती अल्पवयीन असल्याचे त्यास माहिती असून देखील तिच्यावर अत्याचार केला.

तिला काही पैसे दिले. तसेच घडलेली घटना तुझ्या आई बापाला सांगितली तर तुला जीवे ठार मारून टाकेल अशी धमकी दिली. काल पुन्हा असा प्रकार करण्याचा आरोपी प्रयत्न करत असताना पीडित मुलीच्या बहिणीने हा प्रकार पहिला व तिने आई वडिलांना हा प्रकार कळविला.

याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनला पीडितेच्या आईने माहिती दिली असता तात्काळ पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून तक्रारीप्रमाणे आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपी यास अटक करण्यात आलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News