अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात चोरी, दरोडे, लूटमार आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरदिवशी होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतेच जामखेडमध्ये एका माजी सैनिकाच्या घरावर चोरटयांनी डल्ला मारत ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जामखेड शहरातील शिक्षक काॅलनीमधील अंगद कोल्हे हे बाहेर गावी गेलेले असताना यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सामानाची उचकापाचक करून सुमारे ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
कोल्हे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. अंगद जालिंदर कोल्हे, (वय : ३४ वर्षे, धंदा माजी सैनिक, रा. शिक्षक कॉलनी जामखेड) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाटातील सामानाची उचकापाचक करून ६८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कोल्हे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किरण कोळपे हे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम