दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे घडली. या घटने बाबत दिलीप बर्डे याला आरोपी करण्यात आले.

राहुरी तालूक्यातील मुसळवाडी परिसरातील ३५ वर्षीय महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ६ ऑगस्ट रोजी साडेसहा वाजे दरम्यान यातील फिर्यादी ३५ वर्षीय महिला ही तीच्या घरासमोर असताना आरोपी दिलीप गोपीनाथ बर्डे राहणार सोनवणे वस्ती, मुसळवाडी.

हा दारू पिऊन आला व सदर महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचे अंगावरील झंपर काढला. तसेच शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आणि जीवे मारण्याची धमकी दिली. सदर महिलेचे आई-वडील सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ केली.

त्या महिलेने राहुरी पोलिसात धाव घेऊन आरोपी दिलीप गोपीनाथ बर्डे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रभाकर शिरसाठ हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News