अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये इतर गोष्टींबरोबरच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत देखील मोठी वाढ अनुभवायला मिळाली आहे. दरम्यान यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संताप वाढत चालला आहे.
अशातच आता नवीन एलपीजी कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकार प्रधानमंत्री उज्वला योजनेचा दुसरा टप्पा लवकरच लागू करणार आहे. सरकारी तेल कंपन्या या योजनेचा अंतिम मसुदा तयार करत आहेत.

जर तुम्हाला प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही देखील घरबसल्या अर्ज करु शकता. शहरांमध्ये राहणाऱ्या गरीब नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेचं ज्या लोकांचा कायमचा पत्ता नाही तसेच नोकरीमुळे स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत 1 कोटी गॅस कनेक्शन वितरीत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी तुम्ही घरबसल्या अर्ज करु शकता.
मात्र, यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. अर्ज करणाऱ्या महिलेचं वय हे 18 वर्षांपेक्षा अधिक हवं. तसेच त्यांचे बॅंक खाते आणि बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
 - फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम
 













