अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १७ ऑगस्टला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ग्रामीण भागात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत आहे.
लसीकरणाचा घोळ सुरू आहे. नागरिकांना व तरुणांना लस मिळत नाही. त्यात शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे नियोजन नसताना शाळा सुरू करणे चुकीचे ठरेल, असे मत पालकांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन केले जात नाही. लोकसंख्येनुसार लसीकरणाचे नियोजन होणे अपेक्षित आहे.
परंतु लसीकरणाचे डोस कमी येत असल्याचे सांगितले जाते. यामुळे पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांच्या आरोग्य केंद्राचसमोर रांगा लागत आहेत.
यात विद्यार्थ्यांचे कसे होणार, असा प्रश्न पालकांना पडला आहे. अशा परिस्थितीत शासन शाळा सुरू करण्याची घाई कशासाठी करत आहे.
शासन व शिक्षण विभाग मुलांची जबाबदारी घेणार का.? लसीकरण झाल्याशिवाय मुलांना शाळेत बोलावू नये, अशी मागणी काही पालकांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम