अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- राज्य सरकार केंद्र सरकारच्या पैशावर अवलंबून आहे. जलजीवन मिशन अंतर्गत वांबोरीला १५ कोटींचा प्रकल्प आराखडा आहे. याबाबत चार बैठका झाल्या एकदाही खासदाराला बोलावले नाही.
लसीकरणातही राजकीय हस्तक्षेप होतो. एवढी दहशत महाविकास आघाडीच्या आमदारांची काही अधिकाऱ्यांवर आहे, असा आरोप खासदार डाॅ. सुजय विखे यांनी केला. तहसीलदारांना सूचना देऊन काम होत नाही, अशी खंतही खासदार डाॅ. सुजय विखे यांनी व्यक्त केली.
डाॅ. विखे म्हणाले, महाविकास आघाडीच्या आमदारांची नगर जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर मोठी दहशत आहे. राहुरी शहरात प्रांत, तहसीलदारांची बैठक घेऊन वाॅर्डनिहाय लसीकरणाची दिशा ठरवली. प्रत्येक गोष्टीत लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करणे योग्य नाही. जे तुम्ही केले ते काम मांडा.
वांबोरी चारीसाठी प्रशासकीय मान्यता आणली कोणाच्या काळात हे बोलण्याची हिंमत असली पाहिजे. नॅशनल हायवे आला तरी महाविकास आघाडीचे, प्रधानमंत्री सडक योजना आली तरी आम्ही केले, मग आम्ही काय भजे खायला खासदार झालो का ? असा सवालही केला.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे विकास कामांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील, कारखान्याचे अध्यक्ष नामेदव ढोकणे, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड,
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, शामराव निमसे, सुरसिंग पवार, बाळकृष्ण कोळसे, महेश पाटील, रवींद्र म्हसे, उत्तम आढाव, राजेंद्र पटारे, सरपंच किरण ससाणे, उपसरपंच मंदा भिटे, किसन जवरे आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर डाॅ. विखे पत्रकारांशी बोलत होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम