तीन महिन्यांच्या कालावधीत 608 नागरिकांचा कोरोनाने घेतला बळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. आतापर्यंत जभरात कोरोनामुळे लाखो बळी गेले आहे. तर करोडो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचं सावट अधिकाधिक गडद होत चाललं आहे. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यात देखील कोरोनाने धुमाकूळ घातला होता.

यातच जिल्ह्यात कोरोनाने अनेकांचे प्राण हिरावून घेतले आहे. जिल्ह्यात मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत 608 नगरकरांचा करोनाने बळी घेतला. तर 33 हजार 551 लोकांना करोनाचे निदान झाले.

दुसर्‍या लाटेत पॉझिटीव्ह रुग्णांबरोबर मृतांचे प्रमाण मोठे होते. जूनमध्ये यात घट होऊन 583 बाधित समोर आले, तर एकाही नगरकराचा करोनामुळे मृत्यू झाला नाही.

सध्यातरी नगर शहरात रुग्णसंख्या कमी असली तरी ती कधी वाढेल याची भीती सतावत आहे. करोनावर मिळालेले नियंत्रण टिकवायचे असेल तर नगर शहरवासीयांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

कोरोनाची दुसरी लाट मन सून करणारी दुसर्‍या लाटेत नगर शहरातील रुग्णसंख्या वाढत होती. मृतांचे प्रमाणही वाढत होते. याचवेळी नगर शहरातील जिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणार्‍यांचे प्रमाण जास्त होते. उपचारादरम्यान मृत झालेल्या रुग्णांवर महापालिकेतर्फे अंत्यसंस्कार केले जात होते.

नालेगावच्या अमरधामसह केडगाव, बोल्हेगाव व नंतर सावेडी येथील जुन्या कचरा डेपोच्या ठिकाणी अंत्यसंस्काराची सोय केली होती. स्मशानभूमीसमोर रुग्णवाहिकेच्या रांगा, अंत्यविधीसाठी करावी लागणारी प्रतीक्षा, एकाचवेळी अनेकांवर होणारे अंत्यसंस्कार या सर्व गोष्टी मन सुन्न करणार्‍या होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe