अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- नगर पुणे रोड वरील केडगाव येथील कोतकर मळा येथे मोजण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी गजाने दगडाने बेदम मारहाण करून खुनाची धमकी दिल्याची घटना घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अमोल कोतकर यांच्या फिर्यादीवरून गंभीर मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की अमोल मच्छिंद्र कोतकर( वय. 34 राहणार कोतकर मळा पेट्रोल पंपाजवळ केडगाव देवी ) यांची व त्यांच्या चुलत भाऊ अभिजीत अर्जुन खोतकर यांची जमीन शेजारी शेजारी असल्याने सदर जमीन आपापली योग्यरीत्या घेण्याकरिता जमिनीची मोजणी करून घेत असताना जमीन मोजणीवर्ण त्यांच्यामध्ये वाद झाला.
त्यावेळी त्यांच्यात शिवीगाळ झाली. यावेळी अभिजित अर्जुन कोतकर व त्याचा मावस भाऊ संकेत निमसे राहणार कोतकर मळा केडगाव यांनी अमोल कोतकर यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
अभिजीतने बाजूला पडलेल्या लोखंडी गजाने अमोल याच्या डोक्यात तसेच पोटावर पायावर मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अमोल कोतकर यांच्या फिर्यादीवरून गंभीर मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम