अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- स्त्री पुरुषांच्या नात्याची वीण घट्ट होण्यासाठी हेल्दी सेक्स फार महत्वाचा आहे. स्त्री पुरुषांमध्ये कमी जास्त प्रमाणात सेक्सची आवड, इच्छा असते.
मात्र सेक्सचे प्रमाण कितीही असो, त्या पेक्षा सेक्सचा दर्जा म्हणजेच दोन्ही पार्टनर सेक्स एन्जॉय करतात का, ते महत्वाचे आहे. सर्वसाधारणपणे एकच आणि ठराविक पद्धतीचा सेक्स केल्याने दोघेही बोअर होण्याची शक्यता असते. अशावेळी काही नवीन पद्धती ट्राय केल्या जातात.
लग्न झाल्यानंतर काही जण सुरुवातीच्या काळात जास्त सेक्स करतात. काही महिन्यांची सेक्सचं प्रमाण कमी होतं. तुम्ही दोघांनी एकमेकांच्या इच्छेचा आदर ठेवावा. सेक्स करण्यापूर्वी काही पदार्थांचे सेवन न करणे हितवाह ठरते. ते जाणून घेऊयात
– फ्रेंच फ्राईज, पॉपकॉर्न, वेफर्स या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि असे पदार्थ ऑर्गज्मसाठी आश्यक असलेल्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडचण ठरू शकतात.
– कॉफीमुळे कॉर्टिसोल या स्ट्रेस हार्मोन्सची निर्मिती अधिक वाढते. शिवाय कॅफिने कामोत्तेजनाही कमी करतं. रात्री तुम्हाला जेवल्यानंतर, झोपण्याआधी कॉफी पिण्याची सवय असेल, तर तात्काळ सोडा.
– बिअर किंवा वाइन प्यायल्यानंतर रोमांटिक वाटेल तर असं नाही, तुम्हाला झोपही येऊ शकते. कारण यामुळे शरीरातील मेलाटोनिन या स्लीप हार्मोन्सची वाढ होते.
– सेक्सवेळी पुरुष आणि महिला दोघांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असणं खूप गरजेचं आहे. सोयामुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात.
– ब्रोकोली, फ्लॉवर अशा भाज्यांमुळे गॅसची समस्या उद्भवते. पोटदुखी, गॅस यामुळे सेक्समध्ये अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा भाज्या सेक्स करण्याआधी खाऊ नका.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम