सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर वाढताना दिसत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने ऑक्टोबरमध्ये १७७ रूपयांच्या वाढीवसह ४६ हजार ६३ रूपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करताना दिसत आहे.

तर चांदीचा सप्टेंबर महिन्यातील वायदा ४७८ आणि ०.७६ टक्क्यांच्या वाढीसह ६३ हजार ११५ रूपये प्रतिकिलो व्यवहार करताना दिसत आहे.एमसीएक्स वर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली.

एमसीएक्सवर सोने १.३७ टक्क्यांनी घसरून ४६,३११ रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदी २.०३ टक्क्यांनी कमी होऊन ६४,७१० रुपये किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याचे दर काही महिन्यांतील सगळ्यात खालच्या पातळीवर होते.

याच कारण म्हणजे अमेरिकन बाँड उत्पन्नात वाढ आणि डॉलरला आलेली बळकटी आहे.मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ४५ हजार २७० रुपये आणि चांदीचा भाव ६२ हजार ८०० रुपये आहे. तर दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोने ४५ हजार ४९० रुपये आणि चांदी ६२ हजार ८०० रुपये प्रतिकिलो आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe