अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- अभिनेत्री टीना दत्ता ही लोकप्रिय अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
मात्र टीनाने यावेळी शेअर केल्या फोटोमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे. ‘उतरण’ या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

यानंतर टीनाने ‘डायन’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलय. टीनाने इन्स्टाग्राम अकाउंटवर ३ फोटो शेअर केले आहेत. या फोटोत टीना मासाळी बाजारात असल्याचं दिसत आहे.
टीनाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. टीनाला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे ‘निष्पाप प्राण्यांची हत्या थांबवा !!’
दुसरा ‘बोंबिल कसे दिले?’ ‘ही नवीन मालिका येत आहे का?’ ‘मच्छी मार्केट,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी टीनाला ट्रोल केलय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम