अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- राज्यातील शेतकर्याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकर्यास वेठीस धरले जात आहे.
केवळ घोषणांची आतषबाजी करत ठाकरे सरकारने शेतकर्यांची फसवणुक केली असून विविध आपत्तीत भरडलेल्या शेतकर्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी केली आहे.
महाराष्ट्रातील सर्वात लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होणार आहे, अशी टीका आ.पाचपुते यांनी केली आहे. विधिमंडळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील संकटग्रस्त शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याची गर्जना केली.
मात्र त्याला दीड वर्ष उलटले परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात कर्जमाफी पडलेलीच नाही. केवळ बोगस जाहिरातींवर एकशे साठ कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी दीडशे कोटी रुपये कर्जमाफीसाठी दिले असते.
तर संकटग्रस्त शेतकर्यास दिलासा मिळाला असता. पीकविम्याबाबतही विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकर्याची फसवणूक केली जात आहे, असा आरोप आ. पाचपुते यांनी केला.
राज्यातील दीड लाख शेतकरी कुटुंबांना या फसवणुकीचा फटका बसत असताना ठाकरे सरकार मात्र, पाहणी दौर्याच्या नावाखाली मर्सिडीजमधून पर्यटन करण्यात दंग आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
कर्जबाजारी शेतकर्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना ५० हजार देण्याची घोषणा२०१९ मध्ये केली होती.
मात्र त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही तर नाहीच, उलट त्यानंतर नैसर्गिक संकटात शेतकर्यांना वार्यावर सोडले आहे. महाराष्ट्रातील सर्वात लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होणार आहे, अशी टीका आ. पाचपुते यांनी केली आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम