प्रवरा औषध निर्माणशास्‍त्र महाविद्यालयाच्‍या पाच विद्यार्थ्‍यांची बहुराष्‍ट्रीय कंपनीमध्‍ये निवड

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या लोणी येथील औषध निर्माणशास्‍त्र महाविद्यालयाच्‍या पाच विद्यार्थ्‍यांची सॅन्‍डोझ फार्मा (नोव्‍हार्टिस) मुंबई या बहुराष्‍ट्रीय कंपनीमध्‍ये निवड झाली असल्‍याची माहीती प्राचार्य डॉ.संजय भवर यांनी दिली.

करोनाच्‍या संकटामध्‍ये नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात म्‍हणून नुकतेच विद्यार्थ्‍यांसाठी कॅम्‍पस मुलाखातीचे आयोजन महाविद्यालयात करण्‍यात आले होते. सदर मुलाखतीमध्‍ये एकुण १३५ विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदविला होता. त्‍यापैकी एकूण २० विद्यार्थ्‍यांची निवड करण्‍यात आली असून,

महाविद्यालयातील पदय्युत्‍तर अभ्‍यासक्रमातील आण्‍णासाहेब कुडेकर, पदवी अभ्‍यासक्रमातील ओमकार अत्रे, वैभव बनकर, अक्षय बर्डे व अजय सातपुते या विद्यार्थ्‍यांची सॅन्‍डोझ फार्मा, मुंबई येथे निवड करण्‍यात आली आहे. या निवड प्रक्रीयेसाठी सॅन्‍डोझ फार्मा कंपनी मार्फत व्‍यवस्‍थापक समीर कोरे ,समीच चव्‍हाण, जालिदंर सहार व राहुल सातोस्‍कर उपस्थित होते.

विद्यार्थ्‍यांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात म्‍हणून महाविद्यालयात दरवर्षी मुलाखतींचे आयोजन केले जाते. या सर्व निवड झालेल्‍याविद्यार्थ्‍यांना ट्रेनिंग व प्‍लेसमेंट विभागाचे सोमेश्‍वर मनकर तसेच महाविद्यालयाच्‍या प्राध्‍यापकांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्‍यांनी मिळविलेल्‍या यशाबद्दल संस्थेचे अध्‍यक्ष माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील,

जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ यांच्‍यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय भवर आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.