15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह चाईल्ड लाईनच्या सतर्कतेने रोखला

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- चाईल्ड लाइनच्या सतर्कतेने तसेच सोनई पोलिसांच्या सहकार्याने नेवासा तालुक्यातील माका येथे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलींचा विवाह थांबवून तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले.

तसेच पालकांकडून लेखी जबाब देखील घेण्यात आला आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, माका येथे पंधरा वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मंगळवारी चाईल्ड लाइनच्या १०९८ या क्रमांकावर मिळाली होती. माहिती मिळताच चाईल्ड लाइनच्या पथकाने सोनई पोलिसांना माहिती दिली.

तसेच माका येथील ग्रामसेवक व पोलीस पाटील यांना या बालविवाहाची शहानिशा करण्यास सांगितले. त्यानंतर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख आणि चाईल्ड लाडनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सदस्य प्रवीण कदम यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधत या बालविवाहाची माहिती दिली.

त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी सकाळी सोनई पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक कर्पे यांनी माका येथे पथक पाठवून हा बालविवाह थांबविला.

त्यानंतर सदर अल्पवयीन मुलीसह तिचे पालक, नवरदेव यांना बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले. यावेळी मुलीच्या पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत समज देत त्यांचे समुपदेशन करण्यात आले. मुलीचा अठरा वर्षांच्या आत विवाह करणार नाही असा लेखी जबाब घेण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe