अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- अनेक लोकांना अंगावर मोस असण्याची समस्या असते. अनेकांच्या स्कीनवर मोस असते. शरीरातील ह्यूमन पापिल्लोमा व्हायरसमुळे अंगावर मोस येतात. जे शरिरासाठी धोकादायक नसतात पण शरिराची सुंदरता खराब करतात.
अनेकदा त्वचेवरील असमान वृद्धीमुळे देखील शरिरावर मोस तयार होतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही देखील ते शरिरावरुन नाहीसे करु शकतात. ह्या चामखिळींना आपण काही घरगुती उपाय करून पण नाहीसे करू शकतो. जाणून घेऊयात या बद्दल-
१) सफरचंदचं व्हिनेगर : मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही अॅलोविराचं जेल देखील लावू शकतात.
२) लिंबाचा रस : लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.
३) ताज्या कोरफडीच्या जेल तीळ किंवा चामखीळ असलेल्या भागांवर लावावे आणि पट्टीने बांधून ठेवावे. नंतर तास भराने पुसून किंवा धुऊन घ्यावे. दररोज दिवसांतून किमान 3 -4 वेळा हे करावे. तीळ आणि चामखिळीचा नायनाट होतो.
४) कांद्याचा रस शरीरावरील तीळ किंवा चामखीळसाठी कांद्याच्या रसाचा उपयोग करता येते. कांद्याच्या रसाला चामखिळींवर तास भर लावून ठेवणे नंतर स्वच्छ थंड पाण्याने धुवावे. दररोज दिवसांतून हे 2 -4 वेळा करावे.
५) अननसात अॅसिड असते जे शरीरावरील तीळ, चामखीळ काढण्यास उपयुक्त असते. अननसाचा गर किंवा रस ह्यांचा वर कापसाच्या साहाय्याने लावावा. काही काळ तसेच ठेवून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
६) फ्लॉवर मधील व्हिटॅमिन ‘सी’ शरीरावरील तीळ आणि चामखिळ्यांचा नायनाट करण्यास उपयुक्त असते. फ्लॉवरचे रस काढून ते रस त्या जागेवर लावून ठेवावे. अर्ध्या किंवा एका तासाने पाण्याने धुऊन घ्यावे आणि पुसून घ्यावे. चामखीळ आणि तीळ नाहीसे होतील.
७) बटाट्याने शरीरातील काळे डाग जातात. तसेच चामखीळ आणि तीळ काढण्यास हे उपयोगी असते. यामध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म आढळतात. बटाट्याचे काप करून चामखील असलेल्या ठिकाणी चोळवून बँडेज लावून ठेवावे. 7 -8 दिवस असे दररोज करावे. चामखीळ आणि तीळ असल्यास आपोआप बॅंडेज बरोबर निघून जाते.
८) बेकिंग सोडा : चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.
९) मध चामखिळींवर 1 तास लावून बँडेज लावून ठेवणे नंतर बॅंडेज काढून स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावे. नियमित हे केल्यास चांगले परिणाम हाती लागतात.
१० ) हळद ही बऱ्याच गोष्टींसाठी घरगुती उपचार म्हणून वापरली जाते. व्हिटॅमिन सी ची गोळी, मध आणि हळद याची पेस्ट बनवून तीळ आणि चामखिळींवर लावावे. 20 मिनिटानंतर वाळल्यावर पाण्याने धुऊन पुसून घ्यावे. चामखिळीसाठी हे प्रभावी आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम