अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील मांडगे वस्तीवर बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला करून ते ठार केले. यामुळे पशुधन धोक्यात आले असून शेतकरी चिंतेत सापडले आहे.
मागील आठवड्यात या शिवारात बिबट्याने काही शेळ्यांवर हल्ला केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. कुत्र्यांची व रानडुकरांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येते.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे लहारे वस्तीवर राहणारे आण्णा रामचंद्र मांडगे यांच्या घरासमोर बांधलेले वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. मध्यरात्री शेतात राहत असलेल्या मांडगे यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला.
त्यावेळी शेजारी बांधलेल्या गाईने हंबरडा फोडला, त्यामुळे मांडगे कुटुंबाळा जाग आल्याने ते घराबाहेर आले. लोकांचा कल्लोळ पाहिल्यावर वासराला मृतावस्थेत सोडून बिबट्या तेथून पळाला. त्या ठिकाणीही बिबट्याची मादी व बछडे यांचा वावर असल्याचे आढळून आले.
पिंपळगाव पिसा परिसरात उसाचे क्षेत्र भरपूर आहे. कुकडी, विसापूरचे पाणी असल्याने बिबट्यांनी या भागात वस्ती केली आहे. या ठिकाणी वन विभागाचे लक्ष्मण लगड यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला,
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम