अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची अहमदनगर शहर जिल्हा कार्यकारणी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट यांनी जाहीर केली आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये आ.डॉ. सुधीर तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहेत.
नगर शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून विविध फ्रंटल, सेल बळकट करण्याचे काम सुरू आहे. बहुजन समाज, अल्पसंख्याक समाज, ओबीसी समाज याबरोबरच अनुसूचित समाज देखील काँग्रेसचा सुरवातीपासून मूलाधार राहिलेला आहे. अनुसूचित जाती विभागाची कार्यकारणी करत या समाजातील शहराच्या विविध भागातील नवोदीत चेहऱ्यांना या निमित्ताने संधी देण्यात आली आहे.

यावेळी बोलताना आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, नगर शहरामध्ये काँग्रेसचे काम जोरदारपणे सुरू आहे. अनेक नवनवीन चेहऱ्यांना शहरामध्ये काँग्रेस बळकटी करण्याच्या माध्यमातून संधी दिली जात आहे. यामुळे शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. आगामी काळात काँग्रेस हा नगर शहरातील सर्वात बलाढ्य पक्ष म्हणून उभा राहील याबद्दल मला विश्वास आहे.
जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट यांनी मागासवर्गीय समाजाला संघटित करण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले आहे. काँग्रेस पक्षाची ताकद नाथाभाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे असून नगर शहरामध्ये ते मागासवर्गीय काँग्रेस विभागाची जोरदार संघटना उभी करतील असा मला विश्वास आहे. यावेळी अनेक युवक व महिला कार्यकर्त्यांनी नाथाभाऊ अल्लाट यांच्या पुढाकारातून शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
आ. डॉ. तांबे यांनी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे या वेळी पक्षाचा पंचा घालून स्वागत केले. यावेळी बोलताना नाथाभाऊ अल्लाट म्हणाले की, मागासवर्गीय समाज हा काँग्रेसला सुरुवातीपासून मानणारा आहे. भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिली. नगर शहरातील मागासवर्गीय समाज बांधवांना काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली संघटित करण्याचे काम पुढील काळामध्ये आम्ही करू.
यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, यांच्यासह ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे,
अजय मिसाळ आदी उपस्थित होते. अनुसूचित जाती काँग्रेस विभागाचे कार्यकारी पुढील प्रमाणे : शहर जिल्हाध्यक्ष – नाथा भाऊ आल्हाट, कार्याध्यक्ष – प्रताप थोरात, शहर जिल्हा उपाध्यक्ष – संतोष जगताप, शहर संघटक – प्रशांत भिंगारदिवे, शहर जिल्हा सरचिटणीस – गौतम सूर्यवंशी, शहर जिल्हा सचिव – दत्ता भालेराव, भिंगार विभाग अध्यक्ष – जितेंद्र जाधव, नवनागापूर विभाग अध्यक्ष – अविनाश कांबळे ,
महिला शहर जिल्हाध्यक्ष जयश्री सूर्यवंशी, शहर जिल्हा कार्याध्यक्ष सविता विधाते, नगर जिल्हा उपाध्यक्ष रेखा आरोळे, तालुका अध्यक्ष वर्षाताई भिंगारदिवे, शहर संघटक उज्वला गायकवाड आदींसह अन्य 30 पदाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ. लहू कानडे, अनुसूचित जाती काँग्रेस विभाग प्रदेशाध्यक्ष विजयराव अंभोरे आदींनी अभिनंदन केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम