मुलीच्या जन्माने पित्याचे आयुष्य वाढते !

Ahmednagarlive24
Published:

लंडन : आईवडिलांच्या आयुष्यात आनंद भरण्यासोबतच मुली वडिलांच्या आयुष्याची काही वर्षेही वाढवतात. पोलंडच्या जेगीलोनियन यूनिव्हर्सिटीच्या अध्ययनात हा दावा करण्यात आला आहे.

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, मुलीचा पिता ज्या पुरुषांना मुलगी नसते, त्यांच्या तुलनेत जास्त आयुष्य जगतात. मुलगा झाल्याचा पुरुषाच्या प्रकृतीवर किंवा वयावर कोणताही फरक पडत नाही, पण मुलगी झाल्यानंतर पित्याचे आयुष्य ७४ आठवड्यांनी वाढते.

पित्याला जेवढ्या जास्त मुली असतील, तितकेच जास्त आयुष्य तो जगतो. यूनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी मुलांच्या पित्याची प्रकृती आणि वयावर होणार फरक जाणून घेण्यासाठी ४३१० लोकांचा डाटा घेतला. त्यात २१४७ माता आणि २१६३ पिता होते.

शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, अशाप्रकारेच हे पहिलेच संशोधन आहे. यापूर्वी मुलांच्या जन्मानंतर आईच्या प्रकृतीवर आणि वयावर पडत असलेल्या फरकाबाबाबत अभ्यास करण्यात आला होता.

यूनिव्हर्सिटीच्या अन्य एका शास्त्रज्ञाने सांगितले की, मुलींऐवजी मुलांना प्राथमिकता देणारे पिता आपल्या आयुष्याची काही वर्षे स्वत:च कमी करून घेतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment