मी शरद पवार बोलतोय ! शरद पवार यांचा आवाज काढून मागितली ५ कोटींची खंडणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून पिंपरी भागातील धीरज धनाजी पठारे या इसमाकडून ५ कोटींची खंडणी मागण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. हॅलो… मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन टाक, प्रकरण संपवून टाक, असे म्हणून पैशांची मागणी केली. कोणत्यातरी वेबसाईटचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून खंडणी मागितली.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चाकण येथे जानेवारी ते ९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.धीरज धनाजी पठारे (रा. यशवंत नगर, खराडी, पुणे) व त्याचे अनोळखी साथीदार, यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रतापराव वामन खांडेभराड (वय ५४, रा. कडाचीवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाच्या पैशांसाठी आरोपीने फिर्यादीला वारंवार फोन करून धमकी दिली.

आरोपी हा ३० मे २०२१ रोजी फिर्यादीच्या घरी आला. व्याजाचे पाच कोटी रुपये द्याच, असे म्हणून आरोपीने धमकी देत खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर माझ्याशी गाठ आहे. मी तुम्हाला बघून घेईल, तुम्हाला दोघांना जिवंत सोडणार नाही, कोणत्याही प्रकारे संपवून टाकीन अशी धमकीही आरोपीने दिली.

आरोपीने नऊ ऑगस्ट रोजी कोणत्यातरी वेबसाईटचा वापर करून अज्ञात इसमाच्या मार्फत फिर्यादीला फोन केला. हॅलो, मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन टाक, प्रकरण संपवून टाक, असे म्हणून आरोपींनी शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून फिर्यादीकडे पैशांची मागणी केली.

याप्रकरणी आरोपी पठारे व त्याला इंटरनेटद्वारे खोटे कॉल करून त्याला साथ देणारे त्याचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe