अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- मंत्रिपद गमावलेल्या शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात आणखी एका महिलेने तक्रार केली आहे.
यवतमाळ पोलिसांकडे याबाबत पोस्टाने करण्यात आली आहे. संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, अशी लिखित तक्रार या महिलेने केली आहे.यामुळे पुन्हा एकदा राठोड अडचणीत सापडले असून महिलेच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे, यासोबत चित्रा वाघ यांनी या तक्रारीच्या पत्राचे दोन फोटोही पोस्ट केले आहे.चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “शिवसेना आमदार माजीमंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवलीये.
त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतं लैंगिक छळ करतो असं ही त्यात म्हटलंय.” पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले माजी मंत्री संजय राठोड अजून एका आरोपामुळे अडचणीत सापडले आहेत.
पूजा चव्हाण या 22 वर्षीय मुलीने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर संजय राठोड यांच्याशी तिचे संबंध असल्याचे उघडकीस आले. पूजाने 7 फेब्रुवारीला पुणे येथील राहत्या इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केली होती. यात पूजा आणि संजय यांच्यात आत्महत्येपूर्वी संभाषण झाल्याचे पूरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
दरम्यान, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्याने या प्रकरणात संजय राठोड यांना 28 फेब्रुवारी रोजी मंत्रीपद सोडावे लागले होते. तरुणीच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे राठोड यांनी तिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याची भूमिका घेत राजीनामा दिला होता
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम