तलाठ्याच्या बदली रद्दसाठी या गावाचे ग्रामस्थ एकवटले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- अनेकवेळा सरकारी बाबूच्या बदलीसाठी आग्रह केला जातो. अधिकाऱ्याची अनुपस्थित, कामात अनियमितता यामुळे बदलीसाठी ग्रामस्थ आग्रही असतात पण चांगल्या अधिकाऱ्यासाठी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील ग्रामस्थ कामगार तलाठी बदली रद्द करावी या मागणीसाठी एकवटले आहेत.

यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर करण्यात आला अध्यक्षस्थानी सरपंच शैला साळवे या होत्या. ग्रामसभेला उपसरपंच अजित देशमुख, ग्राम पंचायत सदस्य संजय बागुल, उत्तम भालेराव, अर्चना खंडागळे, बापूसाहेब देशमुख, अरुण देशमुख, राजेंद्र देशमुख, मंजाबापू साळवे, पोलिस पाटील विनोद साळवे,

तलाठी प्रशांत हासे, ग्रामसेवक कोल्हे आदी उपस्थित होते. पिंपरणे येथे तीन वर्षांपूर्वी रुजू झालेले तलाठी प्रशांत हासे यांनी कामावर रुजू होताच अनेक चांगले बदल त्यांनी केले होते. प्रत्येकाला सहकार्य करणे कोणत्याही कामाला अडवणूक न करता प्रत्येकच काम झालं पाहिजे.

ही भावना असलेले कोरोना काळात मोलाची कामगिरी केल्याबद्दल त्यांना ग्रामस्थांतर्फे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श तलाठी विभागीय स्तरावरील पुरस्कार त्यांना नुकताच मिळाला होता.

त्यांच्या बदलीमुळे गावच्या विकासकामांत खीळ बसणार असल्याचे म्हणत ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन बदली रद्द करावी, असे आवाहन प्रशासनाला केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News