अहमदनगर ब्रेकिंग : अवैध व्यावसायिक व पोलिस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- नेवासे तालुक्यामध्ये पुन्हा एकदा अवैध व्यवसायाविषयी व्यवसायिकाचे व पोलिस अधिकाऱ्याचे संभाषण ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक विजय करे याना मुख्यालयात बोलावले गेले. नेवासे पोलिस स्टेशनचा कार्यभार सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर यांच्याकडे सोपवला.

नेवासे पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याची अवैध धंदे असणाऱ्या व्यक्तीबरोबर असलेल्या संभाषणाची क्लिप तालुक्यात व्हायरल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. त्या क्लिपमध्ये एक पोलिस अधिकारी समोरच्या व्यक्तीला तुम्ही पिंपळगावमध्ये उच्छाद मांडला असल्याने सगळ्यांचे धंदे बंद करावे लागतील,

मी पोलिस स्टेशनमधून पिंपळगाव येथे येण्यासाठी निघालो असून मी तिथे येण्याआधी सर्व वाहने काढून घ्या, नाहीतर जेवढी वाहने मिळतील तेवढी जप्त करण्यात येतील आणि येथून पुढे मी सांगत नाही, तोपर्यंत सर्व बंद राहील, अशा आशयाच्या संभाषणाची क्लिप नेवासे तालुक्यात फेसबुक, व्हाट्स अॅपच्या माध्यमातून व्हायरल होत आहे.

ही क्लिप कोणी व्हायरल केली? ही वाहने कसली होती? समोरील बोलणारी व्यक्ती कोण? आणि हा पोलिस अधिकारी नेमका कोण? याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात नेवासे पोलिस स्टेशनचा कॉन्स्टेबल गर्जे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्यात सेटिंगबाबतची क्लिप व्हायरल झाल्यानंतर नेवासे तालुक्यात खळबळ उडाली.

या प्रकरणामुळे राठोड यांची तडकाफडकी बदली झाली. विशेष पथकातील आठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. त्या नंतर २४ तासांनी गर्जे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक डेरे यांची त्याआधीच मुख्यालयाला बदली झाली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe