विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मनपाच्या सर्वसाधारण सभेत उडाला गोंधळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- नगर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. सभेच्या सुरुवातीला सेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांनी शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशा शब्दात कवडे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा जाणीवपूर्वक विस्कळीत करण्याचा खोडसाळपणा अधिकारी करत असल्याचा आरोप नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांनी सभागृहात केला. त्यावर प्रशासनाकडून जलभियंता परिमल निकम यांनी खुलासा केला. परंतु, पाऊलबुद्धे यांचे समाधान झाले नाही.

यावेळी अन्य सदस्यांनी उभे राहत जाणीवपूर्वक अधिकारी पाणीपुरवठा विस्कळीत करत असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली. हा तर आमदार जगतापांचा अपमान आहे… औरंगाबादरोडवरील अनधिकृत नळकनेक्शन तोडण्याबाबत चर्चा झाली होती. परंतु, दीड महिना उलटूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.

आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठक होऊन निर्णय होत नसेल तर हा आमदारांचा अवमान आहे, असे पाऊलबुद्धे म्हणाले. सध्या उड्डाणपुलाखालील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे.

हे काम सुरू असताना ११२ नळकनेक्शन अनधिकृत असल्याची बाब सभापती अविनाश घुले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावरून शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनचा शोध घेऊन पाणीपट्टी अकारणीची मागणी अनिल शिंदे यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe