शिष्यवृत्तीच्या परीक्षेला ‘या’ तालुक्यात 392 विद्यार्थांनी फिरवली पाठ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- करोनामुळे मागील वर्षी पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे लाखो विद्यार्थी-पालक संभ्रमात होते.

मात्र, अनेकवेळा तारखा बदलल्यानंतर गुरुवारी तालुक्यात 16 केंद्रांवर शिष्यवृत्तीची परीक्षा झाली. या मध्ये पारनेर तालुक्यात गुरुवारी 16 परीक्षा केंद्रावर पाचवी 1 हजार 895 पैकी 1 हजार 634 विद्यार्थ्यांनी तर आठवीच्या 1 हजार 90 पैकी 959 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली.

392 विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. तालुक्यात 2 हजार 985 पैकी 2 हजार 593 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी ही परीक्षा घेण्यात येते.

शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

पारनेर तालुक्यातील इयत्ता पाचवी जिल्हा परिषदेचे 933 विद्यार्थी हायस्कूलचे 967 विद्यार्थी, आठवीचे जिल्हा परिषदचे 19 विद्यार्थी, माध्यमिकचे 1 हजार 74 विद्यार्थी असे तालुक्यातून 2 हजार 985 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

मात्र तालुक्यात 2 हजार 985 पैकी 2 हजार 593 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दरम्यान कोरोना काळात अखेर हि परीक्षा पार पडली असल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांत आनंदाचे वातावरण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe