अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळेची दरवाजे आता उघडु लागली आहे. बहुतेक ठिकाणी ८ ते १० चे वर्ग चालू झाले आहे.
परंतु हिवरेबाजार वगळता प्राथमिक शाळेतील इ. १ ली ते ४ थीचे वर्ग सुरू झालेले नाहीत. असे असले तरी नगर तालुक्यातील कामरगाव येथे ग्रामपंचायत, शाळा व्यावस्थापन समीती व पालकांच्या संमतीने शाळा सुरू झाली.

सध्या कोरोना चा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे ऑनलाईन अभ्यासामुळे मुले कंटाळलेली असून त्यांच्या मित्रांनाही त्यांना प्रत्यक्ष भेटता येत नाही.
मोकळ्या वातावरणात शिक्षण घेता येत नाही, त्यांना शाळेत जाता येत, नाही बऱ्याच मुलांकडे स्मार्टफोन नाहीत त्यामुळे त्यांची हेळसांड झाली आहे. पालकांना त्यांच्या भवितव्याची चिंता वाटत असून त्यांचा जीव टांगनीला लागला आहे.
यामुळे कामरगाव येथे सर्वानुमते शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. अन पहिल्याच दिवशी ६०टक्के विद्यार्थी पालकांसह उपस्थितीत होते. ऑनलाईन अभ्यासाला कंटाळलेल्या चिमुकल्यांना प्रत्यक्ष शाळेचे,
मित्रांचे व शिक्षकांचे दर्शन मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्वांना मास्क देण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम