चक्क अठ्ठावीस वर्षीय विवाहित महिला एकोणवीस वर्षाच्या मुलाचा हात धरून पळाली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- एका साखर कारखान्यावर वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका विवाहित महिलेने आपल्या पेक्षा दहा वर्ष लहान असणाऱ्या 19 वर्षाच्या मुलाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

दरम्यान याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना या ठिकाणी वीटभट्टीवर काम करणाऱ्या 28 वर्षीय महिलेने आपली दोन मुले सोडून सर्वात लहान मुलगा सोबत घेऊन 19 वर्षीय मुलाला घेऊन पळून गेली आहे.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या दोघांच्या विषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विवाहित महिलेने तिच्यापेक्षा लहान वयाच्या मुलाला पळवून नेले आहे. यामुळे हा विषय संबंध तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe