अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने जिल्ह्यात कहर केला आहे. जिल्ह्यात आजवर अनेकांचे कोरोनामुळे बळी गेले आहे. तसेच कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण देखील सुरुकरण्यात आले आहे. मात्र हे सगळं सुरु असताना एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. पद्मा कृष्णा तांबे (वय 56) यांचा करोनाने शुक्रवारी मृत्यू झाला. विशेषबाब म्हणजे पद्मा यांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असताना त्यांचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मूळच्या राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील रहिवाशी असलेल्या पद्मा तांबे या शिक्षिका आहे. काही दिवसांपूर्वी तांबे यांना करोनाची कोणतीही लक्षणे नसताना त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
त्यामुळे त्यांना लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. लसीचे दोन्ही डोस घेतलेले असल्याने त्यांना फारसा त्रास होणार नाही असा कुटुंबियांना विश्वास होता.
मात्र त्यांची संसर्ग वाढत गेल्याने प्रकृती गंभीर होत गेली. नगरमध्ये उपचार घेण्यात आले मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शुक्रवारी सकाळी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम