अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- सध्या राज्यातील कोकण भागात पावसाने धुमाकूळ घातला असून जोरदार पावसाने या भागातील सर्व नद्यांना पूर आला आहे.
या पुरामुळे या भागातील अनेक गावात पाणी घुसले आहे. तर काही ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी देखील झाली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/08/lahaul-landslide_1628829634.jpeg)
या संकटातून सावरत नाहीत तोच हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
काल लाहौल स्पितीच्या उदयपूर तालुक्यातील नालदा गावाजवळ शुक्रवारी भूस्खलन झाले. त्यामुळे चिनाब नदीचा प्रवाह खंडीत झाला आहे.
नदीच्या प्रवाहातील फक्त १०ते १५ टक्के पाणी सोडले जात आहे. परिणामी नालदा गावाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते . भूस्खलन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने परिसराचा आढावा घेण्यात आला.
तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जवळच्या गावातील लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले असून एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम