अरे बापरे: ‘त्यांना’ वीजचोरी करणे पडले महागात !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- एकीकडे नागरिकांना अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनी विविध उपाय करत आहे तर दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी करण्यात येते.

त्यामुळे अशी वीज चोरी रोखण्यासाठी कंपनीने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार पाथर्डी शहरातील वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध महावितरण कंपनीच्या पथकाने छापे टाकुन आठ जणांची वीजचोरी पकडली आहे. पाच हजार सातशे तिन युनीट वीज चोरी करणाऱ्या आठ जणांना एक लाख तिन हजार ४४० रुपये दंड केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,वाढती वीज चोरी थांबवण्यासाठी सध्या विशेष मोहीम आयोजित केली आहे. त्यानुसार अचानकपणे हे पथक शहरातील विविध भागात वीज चोरी बाबत तपासणी करून कारवाई करीत आहेत. कोणत्या भागात किती वीज गळती होते त्यावर बारकाईने लक्ष ठेऊन कारवाई केली जाते.

त्यानुसार विजचोरी करणाऱ्या विरुद्ध हि दंडात्मक कारवाई केली आहे. यापुढे गुन्हे दाखल करण्याचे कामही हाती घेतले असल्याची माहिती शहराचे सहाय्यक अभियंत्याने दिली आहे.

शहरातील विविध भागात वीज कंपनीच्या पथकाने छापे टाकत. विजचोरीची दंडात्मक रक्कम भरण्याची नोटीस संबधीतांना देण्यात आली आहे.दंडाची रक्कम भरण्यासाठी चोवीस तासाची मुदत महावितरण कार्यालयाने दिली आहे. दंड न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe