अहमदनगर जिल्ह्यातील त्या अल्पवयीन मुलीचा शोध लागेना

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- बेलापूर येथील गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन वीस दिवस झाले आणि पोलिसांना अपहरणकर्त्याचे नाव माहीत असूनही अद्यापही त्या मुलीचा शोध लागला नाही म्हणून विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शुक्रवारी सकाळी बेलापूर श्रीरामपूर चौकात रास्ता रोको करण्यात आला होता.

अपहरणाच्या रुपाने पारतंत्र्यात असलेली मुलीला कधी स्वातंत्र्य मिळेल, असा सवाल विचारला जात आहे. पोलिस अधिकारी, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अश्वासनानंतरच बेलापूर येथे महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आलेला रास्ता रोको मागे घेण्यात आला.

२० दिवसांपूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अद्याप तपास लागला नाही, या घटनेच्या निषेधार्थ महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बेलापूर, श्रीरामपूर चौकात रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, भाजपचे नेते प्रकाश चित्ते, शिवप्रतिष्ठानचे प्रवीण पैठणकर, जय श्रीराम मंडळाचे भरत शेळके, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,

उपसरपंच अभिषेक खंडागळे, सुनील मुथ्था, भाजप नेत्या पुष्पाताई हरदास, किरण सोनवणे, मार्केट कमिटीचे संचालक सुधीर नवले, सुहास पवार, राजेंद्र चव्हाण,

संदीप पवार, लक्ष्मण साळुंके, नरहरी पवार, रामभाऊ पवार, संतोष चव्हाण, कैलास पवार, नवनाथ पवार, रवी चव्हाण, राजू पडवळ, विजय पवार, केशव गोविंद ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब हरदास आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News