अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- आजपासून राज्यात भाजपच्या नवनिर्वाचित केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत,
असे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्री नारायण राणे मात्र 19 ॲागस्टपासून मुंबईतून या यात्रेची सुरूवात करणार आहेत.
560 किमीचा प्रवास हे मंत्री या यात्रेतून करणार असून राज्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन ही यात्रा केली जात आहे. त्यात मराठवाडा, कोकण प्रांत पूर्णपणे पिंजून काढला जाणार आहे.
अशी असेल नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा 19 आणि 20 ऑगस्ट असे दोन ही यात्रा मुंबईत असेल. 21 ऑगस्टला वसई- विरार 23 ऑगस्टला दक्षिण रायगड 24 ऑगस्टला चिपळूण 25 ऑगस्टला रत्नागिरी 26 ऑगस्टला सिंधुदुर्ग 19 ते 26 असा या जन आशीर्वाद यात्रेचा कालावधी असणार आहे.
मुंबईहून सुरु होणाऱ्या या यात्रेचा सिंधुदुर्ग येथे समारोप होईल. दरम्यान या यात्रेत हे चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधतील. या यात्रांच्या संयोजनाची जबाबदारी आमदार संजय केळकर यांच्याकडे आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम