बातमी महत्त्वाची : चेक पेमेंटच्या या बदललेल्या नियमांबाबत माहिती वाचाच…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)ने बँकेच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. हे बदल या महिन्याच्या सुरूवातील म्हणजेच 1 ऑगस्ट 2021 पासून लागू झाले आहेत.

जर तुम्ही चेक पेमेंट करू इच्छिता तर या नियमांबाबत माहिती असायलाच हवी. RBI ने 24 तास आता बल्क क्लिअरिंग सुविधा जारी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचा परिणाम तुमच्या चेक पेमेंटवर होणार आहे. सध्या चेक पेमेंट होण्याला 2 दिवसांचा वेळ लागतो. परंतु या नियमांनंतर 2 दिवसांचा वेळ लागणार नाही. म्हणजेच त्यासाठी तुम्हाला बँकेच्या खात्यामध्ये पुरेसे पैसे ठेवावे लागतील.

जर तुम्ही हा विचार करून चेक देत असाल की उद्या आपल्या खात्यात्या पैसे टाकू आणि आज चेक क्लिअरिंगला देऊ तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते. चेक बॉउंस होऊ शकतो. म्हणून चेक देण्याआधी तुमच्या बँकेच्या खात्यातील रक्कम चेक करा मग चेक क्लिअरिंगला द्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News