मंदिरात कोणाला मिळेल प्रवेश ? वाचा काय म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- करोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र पुन्हा एकदा कुठे सावरत आहे. त्यातच मागील महिन्यात करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने थैमान घातले होते. मात्र, आता रुग्णसंख्या अटोक्यात येत आहे.

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लॉकडाउनमधून सध्या काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे,मात्र अद्याप तरी मंदिर उगडण्याबाबत व प्रवेशा बाबत स्पष्ट असं काही सांगण्यात आलेलं नव्हत.

याबाबत आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मत व्यक्त केलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणार्‍यांना भविष्यात मंदिरात प्रवेश दिला जाऊ शकतो, असे सूचक विधान जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. मात्र सणावाराचा काळ पाहता सध्या धार्मिक स्थळे खुली करण्याचा कोणताही विचार नाही, असा खुलासाही त्यांनी केला.

मंत्री मुश्रीफ स्वतंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांनी रविवारी जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या व दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्यांसाठी पास देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

सध्या सणावारांचे दिवस असल्यामुळे धार्मिक स्थळे खुली करण्याचा विचार नाही. त्यातून संक्रमण वाढेल व बाधितांची संख्या वाढेल. परंतु भविष्यात दोन डोस घेतलेल्यांसाठी धार्मिक स्थळी प्रवेश दिला जाऊ शकतो,

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. जिल्ह्याचा करोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे. परंतु चाचणीचे प्रमाण वाढविल्यामुळे रुग्ण संख्खेत वाढ होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe