अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- गारदे यांच्या वेस्टीज कंपनीच्या नगर-कल्याण रोड वरील ड्रीम सिटी येथील जान्हवी शॉपीचे उद्घाटन आ.तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते.
माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला,
शिवसेनेचे नगरसेवक संग्राम शेळके, नगरसेवक मदन आढाव, युवा सेनेचे शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर, क्रीडा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण गीते, शिवसेनेचे युवा नेते आकाश कातोरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ.तांबे म्हणाले की, कोणताही व्यवसायामध्ये जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. आजच्या व्यावसायिक जगामध्ये ग्राहक हाच राजा आहे. तत्पर सेवा ही काळाची गरज आहे.
गारदे परिवारातील अनंतराव गारदे, सचिन गारदे, नितीन गारदे यांनी वेस्टीज कंपनीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांमध्ये नगर शहरामध्ये व्यवसाय क्षेत्रात संपादन केलेल्या विश्वासामुळेच आज नगर शहरामध्ये वेस्टीज कंपनीची पाचवी शाखा सुरू झाली आहे.
या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. किरण काळे म्हणाले की, अनंतराव गारदे यांनी राजकीय, सामाजिक तसेच व्यावसायिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये यश संपादन केले आहे. एकाच वेळी सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्याची किमया फार कमी लोकांना जमते.
अनंतरावांना ही किमया जमली असून त्यांनी नगर शहरामध्ये आपला एक मोठा गोतावळा निर्माण केला आहे. राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचा विश्वास संपादन करणे सोपे काम नाही. मात्र अनंतरावांना ती किमया देखील जमली आहे. यावेळी अनंतराव गारदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
वेस्टीज कंपनीचे स्टार डायरेक्टर झुबेर देशमुख यांनी कंपनीच्या कामाविषयी उपस्थितांना माहिती दिली. सचिन गारदे, नितीन गारदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
खलील सय्यद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. यावेळी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट, माजी नगरसेविका जरीना पठाण, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, सुमनताई काळापहाड,
सागर गायकवाड, काँग्रेस सरचिटणीस अजित वाडेकर, सचिव प्रशांत वाघ, अजय मिसाळ, काँग्रेस सचिव गणेश आपरे, शंकर आव्हाड, काँग्रेसचे खजिनदार मोहनराव वाखुरे, निसार बागवान, आय.बी. शहा आदींसह राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक, व्यवसाय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम