अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- सध्या तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर आधुनिक फॅशनच्या बहाण्याने जीन्सची टाईट पॅन्ट वापरत आहेत. आहेत. परंतु या टाईट जीन्सच्या पॅन्ट आणि अंडरवेअरमुळे पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणू नष्ट होऊन नपुंसक होण्याचा धोका असतो, तर स्त्रिया वांझ बनू शकतात.
कारण त्यांना गर्भ राहत नाही. याशिवाय पुरुषांना वृषणाचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. फॅशनच्या नावावर आजकाल तरुणीसुद्धा टाइट ब्रा, पॅन्टी आणि पॅन्ट वापरतात. यामुळे अनेक महिलांच्या उरोजांचा आकार बदलतो.
तंग पॅन्ट आणि पॅन्टी वापरणाऱ्या महिलांचे नितंब आणि पोट बेढब दिसू लागते. स्तन मोठे दिसावेत, यासाठी अनेक महिला पी.व्ही. सी. किंवा रबराची जाड ब्रा वापरतात.
परंतु हे अतिशय धोकादायक असल्याचा शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे. पण सिंथेटिक त्वचेच्या संपर्कात आल्यास खूप नुकसान होते. सुमारे ३0 वर्षांपूर्वी भारतीय प्रौढ पुरुषाच्या एक मिलीलिटर वौीर्यामध्ये कमीत कमी चक्क ६ कोटी शुक्राणू असत. पण आता हे प्रमाण तिप्पट कमी झाले आहे.
आता पुरुषांच्या वीर्यात फक्त २ कोटी शुक्राणु आढळून येतात. न्यूयॉर्कच्या स्टेट विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनाचा निष्कर्ष असा की, लॅपटॉपसुद्धा माणसाला मपुंसक बनवू शकतो. ज्यावेळी आपण लॅपटॉपवर काम करतो.
त्यावेळी लॅपटॉपची उष्णता ७0 डिग्री से. असते. यासाठी लॅपटॉप मांडीवरठेवून काम करू नये, असा सल्ला या शास्त्रज्ञांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम