अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- सर्वोच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतीवर बंदी तसेच स्थानिक प्रशासनाने कोरोना उपाय योजना केलेल्या असताना तालुक्यातील कौठे मलकापूर येथे देवीच्या मंदिरासमोर रविवारी बैलगाडा शर्यत भरवण्यात आली.
४७ जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ६ लाख १० हजारांच्या मुद्देमालासह ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संगमनेर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.
यासाठी प्रशासनाची प्रत्येक कार्यक्रमांवर करडी नजर आहे. गर्दीचे ठिकाण व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. असे असतानाही कौठे मलकापूर येथे शर्यती भरविल्या गेल्या.
या शर्यतींची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. बोलेरो पिकअप (एम.एच. १४ एफ.टी ०७००), बैलांची जोडी, बैलगाडा असा ६ लाख १० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
श्रीकांत बाळू मंडलिक (२७), नितीन उत्तम पावडे (३८, जुन्नर-पुणे), नितीन उत्तम थोडकर (२२), शिवाजी रामभाऊ कारंडे (५३), सचिन उत्तम पानसरे (२६), अक्षय बबन डुंबरे, (२५, ओतूर) आदी ६ जणांना घटनास्थळावर अटक करुन सोमवारी जामिनावर सोडण्यात आले.
तर आयोजक लक्ष्मण गजाबा गीते, राहुल गंभीर (कौठे मलकापूर), राकेश खैर (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), सुरेश लक्ष्मण चितळकर, संजय भागा देवकाते (साकुर), बाळासाहेब बबन महाकाल (जुन्नर-पुणे),
राहुल काळे, चैतन्य पडवळ (ओतूर), सतिष गिरजू खेमनर (बिरेवाडी), भाऊसाहेब खेमनर, दादासाहेब चिमाजी खेमनर (हिरेवाडी), विशाल सगाजी खेमनर, शुभम शंकर नान्नर,
अमोल साहेबराव नान्नर (नान्नर वस्ती), बाळू साहेबराव कुदनर (शिंदोडी), प्रतीक संतोष ठोंबरे (जांबुत) आदींसह अन्य २५ जणांवर पोलिस शिपाई विशाल रामदास कर्पे यांच्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायदा व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलिस कॉन्स्टेबल एस. डी. टकले करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम