‘दाम दुप्पट’चे आमिष देऊन लुटणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांकडून अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा पोलिसांनी दाम दुप्पट करण्याच्या आमिषाने लुटणार्‍या दोन भामटयांना अटक केली आहे. त्यानुसार श्रीगोंदा पोलीस पथकाने संतोष साहेबराव देवकर (वय 45) व अशोक फकीरा चव्हाण (वय 45 ) या दोघांना थेऊर ता.हवेली जि.पुणे येथून अटक केली.

या दोघांकडे लबाडलेली रक्कमही सापडली. पोलीसांनी या रोख रकमेसह मोटारसायकल व मोबाईल असे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान हे भामटे नजर चुकवून पैशाच्या पिशवीत फुले ठेवून फसवायचे, असे तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी करमाळा येथील दत्तात्रय शेटे यांनी फिर्याद दिली होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, साधूच्या वेशातील दोन इसमांनी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून साडेचार लाखांना फसविल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते.

हे ठग पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील असल्याची खबर पोलीसांनी मिळाली होती. हे ठग रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी पैसे घेवून बोलवायचे.

तेथे फुलावर पैसे ठेवुन हातावर तांदुळ देवून डोळे मिटून प्रदक्षिणा घालण्यास सांगायचे व हातचलाखीने नजर चुकवून अनेकांची फसवणूक करत. दरम्यान या दोघांना पोलिसांनी अटक एली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि रणजित गट, पोलीस कॉन्स्टेबल किरण भापकर करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe