अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- देशभरात व्यापक लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. १८ वर्षांपासून पुढच्या व्यक्तींना लस दिली जात आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये दिलासा मिळाल्याची भावना असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं एका गंभीर गोष्टीकडे जगाचं आणि विशेषत: भारताचं लक्ष वेधलं आहे. भारत आणि युगांडामध्ये Covishield लसीचे बनावट डोस आढळल्याची माहिती समोर आली आहे.
खुद्द सिरम इन्स्टिट्युटनं याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे लसीकरणामुळे करोनाची भिती काहीशी कमी होत असताना बनावट लसीमुळे ही भिती पुन्हा डोकं वर काढू लागली आहे. भारतामध्ये कोविशिल्ड लसीच्या 2 एमएलच्या वायल्स आढळून आल्या आहेत.
सिरम इन्स्टिट्युटकडून २ एमएलच्या वायल्स तयारच केल्या जात नाहीत. पण वास्तवात युगांडामध्ये १० ऑगस्टलाच एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोविशिल्ड लसींची एक बॅच दिसून आली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं यासंदर्भात इशारा दिला असून अधिक जागरुकपणे काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी या देशांना केलं आहे.
बनावट लसी आढळून आल्यामुळे रूग्णालये, क्लिनिक्स, आरोग्य केंद्र, वितरक, फार्मसी आणि वितरणाच्या इतर सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्याचं आवाहन WHO कडून करण्यात आलं आहे. संपूर्ण देशभरात लसीकरणाची मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जात आहे.
कोवॅक्सिन, कोविशिल्ड, मॉडर्ना, स्पुतनिक व्ही आणि आताच जॉन्सन अँड जॉन्सन या लसीला देखील मान्यता मिळाली आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून 18 वर्षांपासून ते पुढील नागरिकांना लस दिली जात आहे. परंतु आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
भारत आणि युगांडामध्ये कोविशिल्ड लसीचे बनावट डोस आढळल्याची माहिती मिळाली आहे. सिरम इन्स्टिट्युटने याला दुजोरा दिल्याचं समजलं जात आहे.
लसीकरणामुळे कोरोनाची भिती काहीशी कमी होताना दिसत आहे. परंतु बनावट लसीमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये तारांबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची देखील शक्यता प्रचंड प्रमाणात वाढू शकते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम