अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-मतदारसंघातील जनतेने मला निवडून देवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्यावर टाकलेला विश्वास ही माझ्यासाठी संधी आहे. माझ्यावर दाखविलेल्या विश्वास सार्थ ठरविण्यासाठी निवडून आल्यापासून प्रत्येक गावाच्या रस्त्यासाठी निधी आणत असून गावापासून शहरापर्यंत विकास कामे करणे ही माझी जबाबदारी आहे
असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. डाऊच खुर्द येथे भगीरथ पुंगळ घर ते मारुती मंदिर रस्ता व सुभाष पुंगळ घर ते हरिभाऊ गुरसळ घर रस्ता या रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व डाऊच खुर्द ते बढे वस्ती रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रस्त्याबरोबरच वीज रोहीत्राचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांसाठी नवीन रोहित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल डाऊच खुर्द गावातील शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार केला. यावेळी काळे म्हणाले, मतदार संघाच्या विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत मात्र रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या मुख्य विषयांना प्राधान्य देत आहे.
भविष्यात विकासाचे नियोजित उद्दिष्ट्य गाठण्यासाठी मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार आहे. यावेळी बाबासाहेब पुंगळ यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सचिन रोहमारे, आनंद चव्हाण, रोहिदास होन, राहुल रोहमारे, राहुल जगधने, केशव जावळे, विठ्ठल जावळे, धोंडिराम वक्ते, मच्छिंद्र पुंगळ, गोकुळ गुरसळ, शंकर गुरसळ, संतोष पवार,
भास्कर होन, बालम सय्यद, सरपंच संजय गुरसळ, उपसरपंच दिगंबर पवार, पंकज पुंगळ, बाबासाहेब पुंगळ, देवेन रोहमारे, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, कल्याण गुरसळ, पाटीलबा वक्ते, बापूसाहेब वक्ते, नरहरी रोहमारे, राजेंद्र पुंगळ, जगन लिंभुरे, भगीरथ पुंगळ, आनाजी पुंगळ, हरिभाऊ गुरसळ,
बाजीराव पुंगळ, बाळासाहेब गुरसळ, संजय साप्ते, संजय बारशे, मच्छिंद्र बारशे, गणेश बारशे, बाबासाहेब बारशे, साहेबराव पुंगळ, लक्ष्मण पुंगळ, निरंजन पुंगळ, किशोर पवार, सुभाष पुंगळ, संतोष पवार, सखाहारी बढे, विष्णू गुरसळ, बाबासाहेब गुरसळ, राजेंद्र पुंगळ, राजेंद्र गुरसळ, राजेंद्र पगारे, खतीब सय्यद, महेंद्र वक्ते आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम