अहमदनगर जिल्हा हादरला ! बदनामीच्या भीतीने पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-बलात्काराच्या गुन्ह्यात मुलास अडकविले आणि त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी एका महिलेने दोन लाख रुपयांची मागणी केली.

या गुन्ह्यात सहआरोपी केलेल्या मुलीच्या आई वडिलांनी बदनामी झाली म्हणून एकाच वेळी राहते घरात आपली जिवणयात्रा संपविली. ही घटना अकोले तालुक्यातील चिंचावणे येथे मंगळवार दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी 1 वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि तुमच्या मुलावर दाखल झालेली बलात्काराची केस मागे घेतो. त्यासाठी दवाखान्याचा खर्च व दोन लाख रुपये द्या, अशा मागणीचा तगादा व बदनामी सहन न झाल्याने राजूर येथील मुलाच्या आई-वडिलांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

चिंचवणे ता. अकोले येथील दीपक सोमनाथ कुलाळ (वय 22) याने याबाबत राजूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी दीपक कुलाळ याचा दुसरा भाऊ यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्ह्यापूर्वी दाखल आहे. तो सध्या जेलमध्ये अटकेत आहे. त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

आरोपी शीतल रामा मुठे व तिचे वडील यांनी भाऊ व आई वडिलांवर बलात्काराची केस दाखल केली आहे. केस मागे घेतो, परंतु त्यासाठी दवाखान्याचा खर्च व दोन लाख रुपये द्या असा तगादा आरोपींकडून सुरू होता. ही बदनामी व भीती सहन न झाल्याने फिर्यादी दीपक कुलाल

याचे वडील सोमनाथ नामदेव कुलाळ (वय 50), जिजाबाई सोमनाथ कुलाळ (वय 45, रा. चिंचवणे ता. अकोले) यांनी आपल्या राहत्या घरात लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि १७) दुपारी चिंचवणे येथे राहत्या घरी ही घटना घडली.

याबाबत राजूर पोलिसांत आरोपी शीतल रामा काठे व तिचे वडील मुठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे, पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी घटनास्थळी भेट दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News