अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- बऱ्याच अवधीनंतर संगमनेर शहरासह तालुक्यात दूरवर दमदार पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट आलेल्या खरिपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
बुधवारी दुपारी तासभर पडलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी केले. छोटे-मोठे ओढेनाले वाहताना दिसले. यामुळे शेतकरी व नागरिक चांगलेच सुखावले.
श्रावणात श्रावणसरी न पडल्याने खरीप हंगामावर दुबार पेरणीचे संकट होते. शेतकरी वर्ग पावसाअभावी चिंतेत होता. खरिपाच्या पिकांना पाणी नसल्याने पिके जळून चालली होती.
पावसाचे वातावरण होऊनही तो पडत नव्हता. भंडारदरा व निळवंडे धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने दोन्ही धरणांचा पाणी साठा वाढला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम