अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स तब्बल 52 टक्क्यांनी घसरले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :-आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासाठी सध्या कठीण काळ सुरु आहे. अदानी समूहाच्या 6 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स गेल्या तीन महिन्यांत 52 टक्क्यांनी घसरले आहेत.

या कालावधीत अदानी टोटल गॅसमध्ये 42.5 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 38.2 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 32.9 टक्के, अदानी पोर्ट्स आणि एसईझेडमध्ये 23.1 टक्के.

अदानी एंटरप्रायझेसमध्ये 16.1 टक्क्यांची घट झाली आहे. अदानी समूहाचे सर्व शेअर्स मे ते जून दरम्यान 52 आठवड्यांच्या टॉपवर पोहोचले होते. यात अदानी पॉवरचे शेअर्स सर्वाधिक 52 टक्क्यांनी घसरले आहेत.

तीन महिन्यापूर्वी हा शेअर 9 जून रोजी 167.1 रुपयांवर पोहोचला होता, जो 52 आठवड्यांचा उच्चांक होता.17 ऑगस्ट रोजी हा शेअर 79.9 रुपयांवर घसरला आहे. प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी अडचणीत आले आहेत.

अदानी ग्रुपमध्ये करण्यात आलेली 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही गुंतवणूक करणाऱ्या तीन बड्या गुंतवणूकदारांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॅाझिटरी लिमिटेड (NSDL) ने गोठवली आहे.

शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे अदानीची संपत्तीही कमी झाली आहे. 14 जून रोजी अदानीची संपत्ती 77 अब्ज डॉलरवर पोहोचली होती, परंतु आता ती 54.5 अब्ज डॉलरवर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe