एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : शासकीय विमानसेवा कंपनी एअर इंडियाचे खासगीकरण होणार नाही, अशी माहिती केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नुकतीच राज्यसभेत दिली. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले.

कंपनीचे खासगीकरण करण्यापेक्षा कंपनी बंद केली जाईल. एअर इंडिया कंपनीतील वैमानिक खासगीकरण केले जाणार असल्याने एअरलाइन्स सोडत आहे का?, असा प्रश्न हरदीप सिंग पुरी यांना राज्यसभेत विचारण्यात आला होता.

याच्या उत्तरादाखल पुरी यांनी ही शक्यता नकारली आहे. एअर इंडिया प्रकरणी मंत्री समूहाने (जीओएम) बैठक घेत काही निर्णय घेतले आहे. ही कंपनी ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबली आहे.
समितीने हा कर्जभार उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गुंतवणूकदारांनाही आकर्षित केले जाईल. यापूर्वी एअर इंडिया आणि टाटा समूहाने एअर इंडिया कंपनी खरेदी करण्यात रुची दर्शविली होती.
परंतु, या कंपनीवरील कर्जाचा प्रचंड भार लक्षात घेऊन दोन्ही कंपन्यांनी एअर इंडियाची खरेदी करण्यास नकार दिला.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment