अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी सदैव उभे असणाऱ्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच भावा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणासाठी श्रीरामपूर येथील संस्कार भारती रांगोळी कलाकार सौ. कलावती राधाकृष्ण देशमुख यांनी स्वतः तयार केलेल्या १९५० राख्या लेह, श्रीनगर आणि जम्मू येथे कार्यरत असणाऱ्या भारतीय जवानांसाठी पाठविल्या.
आपल्या घरापासून हजारो किलोमीटर दूर भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी उभे असणाऱ्या सैनिकांना आपल्या बहिणीची आठवण येत असते परंतु प्रत्येक जण घरी येऊ शकत नाही तरी त्यांना रक्षाबंधनाचा आनंद मिळवा व बहिणीची आठवण कायम राहावी याकरिता हा उपक्रम सौ. देशमुख यांनी राबविला.
या उपक्रमासाठी रिटायर्ड ब्रिगेडियर मा. हेमंतकुमार (मेडिकल सुप्रीडेडंट, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी) यांचे मार्गदर्शन मिळाले. सदर उपक्रमासाठी सौ. देशमुख, रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे बन्सीलाल फेरवानी, सतपालसिंग,पत्रकार दत्तात्रय थोरात यांनी मेहनत घेतली.
श्रीरामपूर पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्तर श्री.सागर आढाव, श्री.विजय कोल्हे, श्री. गोरख दाहिवाळकर, श्री. बाळासाहेब गोडगे, श्री.निलेश कुलथे, श्री.अमोल मुळे,श्री.निलेश मैड यांनी हे पार्सल तातडीने पाठवण्याची व्यवस्था करून अनमोल सहकार्य केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम