अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- कोरोना मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता मागील वर्षभरामध्ये तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षी ६६ टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दर्शवली असतानाच यंदा मात्र अवघ्या २४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिलाय.
इंडिया टुडेने घेतलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आलीय. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी होण्यामागील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला आलेलं अपयश.
“करोनाची पहिली लाट आली तेव्हा पंतप्रधान मोदींची नेता म्हणून लोकप्रियता जानेवारी २०२१ मध्ये ७३ टक्के इतकी होती. मात्र दुसऱ्या लाटेमधील केंद्र सरकारचा कारभार आणि त्यामुळे सर्वसामान्यांना झालेल्या अडचणी यामुळे मोदींची लोकप्रियता ४९ टक्क्यांनी कमी झालीय,” असं इंडिया टुडेच्या या सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.
निवडणूक प्रचार सभांमुळेच देशामध्ये करोनाची दुसरी लाट आल्याचं मत २७ टक्के भारतीयांनी व्यक्त केलं आहे. तर २६ टक्के लोकांनी करोना संदर्भातील नियमांचं पालन न केल्याने दुसरी लाट आल्याचं मत व्यक्त केलंय.
तर मोदी सरकारला करोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचं मत २०२० साली ऑगस्ट महिन्यात २३ टक्के लोकांनी व्यक्त केलेलं. आता एका वर्षानंतर मोदी सरकारच्या करोनासंदर्भातील कामावर नाराज असणाऱ्यांची संख्या वाढून ४९ टक्क्यांवर गेलीय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम