अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :-शेतातुन चंदनाचे झाड चोरणार्या तस्कराला पोलीसांनी अटक केली आहे. तर त्याचे उर्वरित साथीदार साथीदार फरार झाले आहेत. हि घटना बेलवंडी परिरात घडली आहे.
संजय गंगाधर माळी रा.पाचेगाव, (तालुका नेवासा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलवंडी येथील नितीन भोसले यांच्या शेत बांधालगत असलेले चंदनाचे झाडे कापुन, उघड्यावरुन चोरी करण्याचा प्रयत्न टोळी करत होती.
याची खबर बेलवंडी पोलीसांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी छापा घातला. या छाप्यात 20 किलो चंदन, एक कारसह चंदन चोरीचे साहित्य असे 40 हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
यात संजय गंगाधर माळी याला पोलिसांनी अटक केली तर उर्वरित पाच जण फरार झाले. यात शिवाजी साहेबराव मोरे, संदीप कैलास मोरे, सतीश संजय माळी, राहुल संजय मांजरे, अरुण शिंदे यांच्या विरोधात चंदन चोरीचा गुन्हा बेलवंडी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम