अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी जातीपातीचे राजकारण हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर उदयास आले असे सत्यपरिस्थितीला अनुसरून विधान केले होते.
हे विधान करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही सत्य परिस्तिथी त्यांनी मांडली त्यांच्या या विधानाने राष्ट्रवादी पक्षा मध्ये भूकंप त्यांचे अनेक नेते राज साहेब ठाकरे यांच्या वर टीका करायला लागले
परंतू राजकारणात एखाद्या टिकेला उत्तर देताना ते वैचारीक पध्दतीने दिले पाहिजे तसे न करता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रातील जनते साठी अहोरात्र झटणारे राज साहेब ठाकरे यांच्या वर राष्ट्रद्रोही असल्याचे आक्षेपार्ह ट्विट करून महाराष्ट्रातील तमाम जनतेची मने दुखावलीआहे
त्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रातील जनतेची तसेच राज साहेब ठाकरे यांची जाहिर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या काळात
आमदार अमोल मिटकरी यांचा एकही कार्यक्रम अहमदनगर शहरात होऊ देणार नाही याची त्यांनी याची नोंद घ्यावी असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव नितीन भूतारे यांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम