दरोड्याच्या तयारीतील दोघांना पोलिसांनी पकडले तर अन्य तिघे पळून जाण्यात यशस्वी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- राहुरी पोलिसांचे एक पथक मध्यरात्रीच्या दरम्यान कोंबीग ऑपरेशन करत होते. त्यावेळी गुप्त खबऱ्याने मिहिती दिली कि, नगर मनमाड राज्य महामार्गावर शहर हद्दीत पाच दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.

पोलिस पथकाने ताबडतोब छापा टाकला. यावेळी दोघांना पाठलाग करून पकडले तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दिनांक २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव, हवालदार महेंद्र गुंजाळ व चालक लक्ष्मण बोडखे आदि पोलिसांचे पथक कोंबीग ऑपरेशन करत होते.

या दरम्यान गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर जुने बस स्थानक परिसरात रात्री साडेबारा वाजे दरम्यान छापा टाकला. त्यावेळी तेथे पाचजण एका घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. पोलिसांना पाहताच ते पळू लागले.

यावेळी पोलिस पथकाने दोघां जणांना पाठलाग करुन पकडले. तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पकडण्यात आलेले दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांची नावे भारत भाऊसाहेब ढोकणे वय २८ वर्षे राहणार जुने बस स्थानक तसेच ओमकार सुनिल डहाके वय २१ वर्षे राहणार कोळीवाडा राहुरी.

अशी त्यांची नावे आहेत. त्यांना पकडले त्यावेळी त्यांच्या ताब्यातून मिरची पुड व एक लोखंडी टामी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. बाकी पसार असलेल्या तिन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस चालक लक्ष्मण बोडखे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भारत भाऊसाहेब ढोकणे,

ओमकार सुनिल डहाके व इतर तिघेजण असे एकूण पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपूत हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe